Skip to main content

Featured

Dear December ❣️

 डियर दिसंबर, तुमसे इश्क़ क्यों है, ये बताना आसान नहीं ..तुम्हारे आते ही नए साल की गिनती शुरू हो जाती है,पर मेरे लिए तुम सिर्फ एक महीना या तारीख नहीं, एक दरवाजा हो—नए सफर, नई कहानियों और नए रास्तों का जो मेरी मंजिलों के और भी मुझे करीब लेकर जाता है ... तुम्हारी ठंडी हवाएं जब चेहरे को छूती हैं, लगता है जैसे पुराने गमों को उड़ाकर ले जा रही हो.. हर बार उसी मलबे में एक नई राह दिखाई है.. शायद इसलिए मैं तुम्हें हर बार एक उम्मीद की तरह देखती हूं.. तुम्हारे आते ही पेड़ों से गिरते पत्ते मुझे सिखाते हैं, कि कुछ छोड़ देना भी जरूरी होता है आगे बढ़ने के लिए.. तुम्हारी शफ्फाक शामों में, जब सूरज धीमे-धीमे डूबता है, मैं खुद को तुम्हारी गोद में एक बच्ची की तरह पाती हूं.. सहमी हुई, पर भरोसे से भरी...तुम्हारे साथ मैं अपना सारा बोझ हल्का कर देती हूं...तुम्हारी दस्तक हमेशा रहती है, एक दुआ की तरह, एक बदलाव की तरह.. तुम्हारी रूह की सर्दियों में जीते हुए, गुजरे हुए साल के लम्हों को फिर से जीती हूं ... ताकी इस गुजरे हुए साल की यादें छोड़कर आगे नए साल में बढ़ पाऊं .. नई उम्मीदों के साथ .. कुछ साथी जो साथ चल...

Post I Read in SAKAL SMART SOBTI Really Good..........



गात प्रत्येक गोष्टीचे मापदंड ठरलेले असतात, सौंदर्याचे नियम तर कडक. अमुक एवढी उंची, गोरा रंग, लांबसडक केस, डोळ्यांचा विशिष्ट रंग... साधारण सगळीकडे हेच ठरलेलं असतं; पण एखादी मुलगी हे सगळे नियम धाब्यावर बसवून सुपरमॉडेल बनते तेव्हा जगभरच्या मुलींसाठी "आयकॉन‘ ठरते.

ऍलेक वेक, दक्षिण सुदानमधील एका वस्तीवर ऍलेक राहयची. डिंका टोळीचं प्रतिनिधित्व करणारं हे गाव. ऍलेक मिळून सगळी नऊ भावंडं. त्यातली ऍलेक सातवी. तिची आई गृहिणी होती, तर वडील शिक्षण अधिकारी. ऍलेक आपल्या वडिलांसारखीच उंचाडी होती. सहा फूट उंच, कभिन्न काळा रंग, लांबुडके पाय... ऍलेकने चेहरा आईकडून घेतला... छोटसं रेखीव हसू आणि गालांची विशिष्ट ठेवण.
ऍलेक या शब्दांचा डिंका भाषेत अर्थ आहे "काळे ठिपके असलेली गाय‘ ऍलेकची आई तिला नेहमी सांगायची, "बाईचं सौंदर्य तिच्या मनात असतं. ते जपायला हवं.‘ ऍलेकच्या डोक्‍यात हे पक्क बसलं होतं. लहान असल्यापासूनच ऍलेकला सोरियासिस हा त्वचारोग होता. तरीही आपल्यात काही न्यून आहे असं ऍलेकच्या आईने तिला कधी जाणवू दिलं नाही. ऍलेक पाच वर्षांची असताना सुदानमध्ये यादवी युद्ध सुरू झालं. आधीच परिस्थिती बिकट, पाणी, वीज काहीच नव्हतं. मग रोज अवतीभवतीची माणसं गायब व्हायला लागली. रस्त्यावर मृतदेह पडलेले दिसू लागले. जगणं अवघड झालं. ऍलेकच्या आई-वडिलांनी सुदान सोडायचं ठरवलं. लपत-छपत, झुडपांचा आश्रय घेत ऍलेकचं कुटुंब देशाच्या सीमेकडे जायला लागले. ऍलेकचे वडील आजारी पडले आणि त्यांना चालणं असह्य व्हायला लागलं. ऍलेकच्या आईने तिला काकांसोबत इंग्लंडला पाठवलं. पुढे पाच महिन्यांनी तिची आई इंग्लंडला आली. वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे ऍलेकच्या वडिलांचे निधन झाले होते.

ऍलेक इंग्लंडमध्ये आल्यावर तिचा सोरियासिस गायब झाला. चौदाव्या वर्षी तिने लंडन स्कूल ऑफ फॅशनमध्ये प्रवेश घेतला. खरं तर इंग्लंडमध्ये आली तेव्हा तिला डिंगा आणि अरेबिक या दोनच भाषा येत होत्या. खासगी शिकवणी लावून ऍलेक पहिल्यांदा इंग्रजी भाषा शिकली. ऍलेक अठरा वर्षांची झाली आणि अगदी अपघाताने तिचं मॉडेलिंगमधील करिअर सुरू झालं. एका बागेत मॉडेल एजंटने तिला पाहिलं आणि मॉडेलिंगची ऑफर दिली. सुरवातीला ऍलेक गांगरली, कारण मॉडेल म्हणून रुढ असलेल्या कुठल्याच व्याख्येत तिचं सौंदर्य बसत नव्हतं; पण तिने आत्मविश्‍वासाने रॅम्पवर पाऊल ठेवलं. "आपण परिधान केलेला ड्रेस शिवणारी एक साधी कष्टकरी बाई आहे, आपण तिच्यासाठी रॅम्पवर आहोत ही भावना मला आत्मविश्‍वास देते.‘ ऍलेक सांगते. 
ऍलेकने जगातील सर्व नामांकित उत्पादनाच्या जाहिराती केल्या आहेत. आणि 1997 मध्ये "सुपरमॉडेल ऑफ द इयर‘ हा किताब पटकावला आहे.
सुदानमधून आलेली एक निर्वासित ते सुपर मॉडेल हा आपला प्रवास तिने शब्दबद्धही केला आहे. ऍलेक आज युनायटेड नेशन्सच्या सुदानी निर्वासित संस्थेसाठी काम करते आहे. सुदानमधील आरोग्य, शिक्षण सेवेसाठी इतर संस्थांमार्फत योगदान देते आहे. तिचा प्रवास कथित सौंदर्याच्या मापदंडामध्ये आत्मविश्‍वास हरवलेल्या हजारो कृष्णवर्णीय तरुणींना प्रेरणा देणारा आहे.
सक्सेस मंत्र
  • तुम्ही गर्दीबरोबर कधीही जाऊ नका.
  • सौंदर्य तुमच्या मनात कायमस्वरुपी आहे.
  • आपण एकटे मोठे नाही होऊ शकत, इतरांच्या सहकार्याचे महत्त्व मोठे असते.
  • नेहमी सर्वांना मदत करा.
  • हरु नका, प्रयत्न करा.

Comments

Post a Comment

Popular Posts