ही आहे एका मुलीची तुमची माझी स्वप्न . एका मुलीच्या अपेक्षा तिची स्वप्न तिचं असणं आणि नसणं कुठेतरी वाचला कि माहेरचे म्हणतात कि मुलगी परक्या घराची अमानत असते,सासरचे म्हणतात हि दुसऱ्या घरून आली आहे हि कस समजेल आपल्याला मग मला विचारावस वाटत कि देव तू मुलीला कोणासाठी बनविल… माहेरी गेल्यावर सांगतात तू दोन दिवसाची पाहुणी तुला काय सांगायचे??? सासरचे सांगतात तू तर परक्या घराची?मग आम्ही आहोत तरी कुणाच्या नेमक्या कुणी आपला म्हुणुन वागवत खरी?? का मुलगी सगळ्यांना नको असते म्हणतात कि एक मुलगी दोन घरांचा प्रकाश असते…. मुलगी सुसंस्कारी असावी… अशी आणि तशी असावी सगळ्या अपेक्षांचं ओझ तिच्याच खांद्यावर असत…. माहेरी असल्यावर आपल्यामुळे आपल्या आई बाबांना मान खाली नको घालावी म्हणून सतत प्रयत्नशील असते हे नको करायला ते नको करायला अरे आपण याच्याशी किवा तिच्याशी मैत्री केल्यावर कुणी बोलणार नाही न… आपण हे शिक्षण घेतला म्हणजे काय आपण लग्नाच्या वेळी या मुलाच्या criteria मध्ये फीट होऊ ना …. लग्नाच्या बाजारात आपली बोली काय असेल ?? कोणता चांगला वेल settled मुलगा आपणास हो म्हणेल न?? किती प्रश्न असतात नाही एक मुलगी म्हणून जन्माला आल्यावर ??पण का हे अपेक्षाच ओझा कायम मुलीच्याच खांद्यावर??
आई वडील हि मुलीला हे नको करू ते नको करू बजावत असतात…. तिची स्वप्न तीच बालपन कुठे हरवतात तिला कळत नाही आई किवा बाबाना कळत नाही की अरे माज़ी मुलगी कधी मोठी zali
अगदी लहान वयात सगळ्या अपेक्षांच ओज़ा असत तिच्यावर ..... घर सामभाळने लहान भाऊ बहिनी अस सगळा करण्यासरख असल्यामुळे तिच्या स्वत: साठी वेळ कुठे असतो तिच्याजवळ तीच निरागस बालपन कधीच सोडून गेलेले असते तिला….
तिला भातुकलीचा खेल खेळायचा असतो तिल दूर रानात भटकायच असत तिला खुप सगळ्या मैत्रिणी मित्र जमवायचे असतात त्यांच्या बरोबर वेळ घालवायचा असतो… पण शाळेतून घरी आल्यावर राहते बस जवाबदारी आणि मग दूर खिडकीतून ती पाहत राहते सगळे कसे मस्ती करताय किती आनंदी आहेत…
एवढयात ती तारुण्याच्या उंबरठयावर येउन पोहचते …।
आणि तीय्च्यावारचे ओझे अजून वाढते … तीच जग बदललेलं असत तिची कळी खुललेली असते सगळ कस नवं असत तिच्या भावना … तिच्यातले बदल …. मग ते हार्मोस असो कि तिच्या मनातली उलाढाल …। कधी सगळ कस पाण्यासारख स्वछ तर कधी सगळ धुक्याआड लपलेलं…. ती कावरी बावरी झालेली असते एक वेगळीच खळबळ चाललेली असते मनात…. अशावेळी तिला जरूर असते ती साथीची …. मग ती तिच्या घरच्यांमध्ये कुणी आपल मित्र होईल का शोधू लागते… कधी तिची मैत्रीण असते ती आई… तर कधी तिची खास अशी मैत्रीण जिच्याजवळ सगळ ती मनातल सगळ गुपित सांगत असते…. …। तिच्या स्वप्नांना नवी दिशा मिळालेली असते …. ती अम्बिशिअस झालेली असते स्वप्नांच्या उडानाला आभाळ छोट पडत…… तिचा आकर्षण वाढेलेला असत तिला खूप काही करायचं असत …. तिचे स्वन त्याबरोबरच तिच्या भावी जीवनाची स्वप्न हि ती रंगउ लागलेली असते … तिचा जीवनसाथी कसा असेल तो तिची साथ देईल ना ति राजकुमाराचे स्वप्न रंगवते …। घरात हि शोधाशोध सुरु झालेली असते कारण मुलगी वयात आलेली असते न……
लग्नाच्या या सगळ्या गोस्ठींची सुरुवात होते ती मुलगा पाहण्यापासून किवा " कांदे पोह्यांपासून"
पण नेहमी मला न उलगडलेलं एक कोड म्हणजे कि संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असलेला निर्णय फक्त अर्ध्या तासाच्या कांदे पोह्यानावर ठरवात तरी कसा, साडी घ्यायला जरी गेले असतील किवा दुसरा काही तरीही कमीत कमी एक ते दोन तास लागतात पंनास दुकानी पाहून टाकलेल्या असतात कधी तर एकही साडी नाही आवडली म्हणून परत हि येतात मग मुलीच्या एवडा मोठा निर्णय अर्ध्या तासात घेतात तरी कसा…। तो मुलगा कसा आहे त्याचे घरातले कसे आहेत… हे सगळ नंतर तिच्यासाठी surprize असत …।बरच काही काळाच्या पडद्याआड लपलेलं असत….
एक ठराविक वयापासूनच ती या स्वनामध्ये रंगलेली असते… तिच्या आयुष्याचा भावी जोडीदार कसा असावा त्याच चित्र तिने मनात रंगवलेल असत… लग्न म्हणजे दोन जीवांच मिलन…. दोन घराच गुंफन…. दोन चालीरीतींचे मिलन असत…. प्रेम आपुलकी असे अनेक पदर असतात या मिलानला… तिच्या अपेक्षांचे पदर या सर्वांभोवती ती गुंफत असते …. माझी सासू माझा नवरा माझे हे आणि माझे ते पण।??? तिला माझ म्हणणार असत का कुणी तिथ हा सगळ्यात मोठा प्रश्न सतावत असतो तिला??? मला तिथे कसे राहायचे कसे बोलयाचे सगळा काही गुपित असत …. कारण सासर म्हणजे काहीतरी भयंकर अशी जागा असते आणि तिथे सुनेला अशी वागणूक मिळते तशी वागणूक मिळते ?? अश्या चित्र विचित्र संकल्पना असतात बरेच काही ऐकून ठेवलेले असते तिने सासर बद्दल म्हणजे मनात धाकधूक तर असेतच …. आणि मग तो दिवस तर उगवतो ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट पाहत असते या एका दिवसत ती कुणाची सून कुणाची बायको आणि कुणाची वहिनी असे सगळे नाव तिला मिळालेले असतात…… फक्त एक दिवस नवरी म्हणून तिला मान असतो पण नवरा नवरा तर जीवनभर नवराच असतो अस का ????
Nice 👍👌
ReplyDeleteThank you
Delete