रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एवढा गुंतला आहे कि त्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ राहिला नाही आहे रोज सकाळी उठा ९ वाजले कि घराच्या बाहेर पडण्याची घाई लागलेली असते सगळयांना ऑफिस ला आज लेट तर होणार नाही ना मनात हाच विचार चाललेला असतो .... सकाळचे ते गोडं सूर.. ती आरती .... सगळं कस दूर होऊन गेलं आहे ...कुठेतरी हरवल्यासारख आहे सगळ कस..
रोजच येणार दिवस नविन काहीतरी घेऊन येत असतो कधी चांगला तर कधी वाईट कधी चांगला ...... ह्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला दिवस कुठे निघुन जातो ते कलत ही नाही सकाळ होऊन रात्र कधी झालेली असते तेही कळत नाही .... कधी कधी त्याला वाटत कि अरे सगळं कास मागे सुटत चाललं आहे का ... ते संध्याकाळचं कट्ट्यावर बसणं ... गप्पा मैफिली रंगवणं .. आणि मित्राच्या सहवासात स्वतःला विसरणं ....
हे सगळं कधीच हरवलं आहे ... विज्ञानाने जग जवळ तर आल पण माणूस स्वतःपासून आणि सगळ्यांपासून कधीच दूर गेला आहे .... आता भेट होते ति फक्त फोने वरच ... माणसाला माणूस अगदी जवळ असला तरी दिसत नाही .. जो तो गुंतला आहे स्वतः मध्ये....
मग कधीतरी त्याला सायंकाळी सवड मिळते .... तो रवी चराचराच स्वतःच साम्राज्य नाईलाजाने सोडून जात असतो ... जाता जाता त्याच्या मनातील अगतिकता त्याच्या मनातही घर करून जाते ...हुरहूर लावून जाते .... अस्वस्थ करून जाते ... मनात विचारांचं काहूर माजलेला असत ... अशी ती वेळ असते कातरवेळ ... कातरवेळ हुरहूर लावून जाणारी कातरवेळ... कातरवेळ म्हणजे नेमका काय तर संध्याकाळ आणि रात्र यामधली वेळ.... काळजाचा ठोका चुकवणारी कातरवेळ... जीव घेणारी कातरवेळ... कुणाची तरी आठवण देऊन जाणारी कातरवेळ .... मनावर अचानक मळभ आणणारी कातरवेळ... कुठेतरी दूर हृदयाच्या सोनेरी कुपीत दडलेले सोनेरी क्षणाची कुपी अलगद उघडणारी कातरवेळ...मागे सुटलेले ते क्षण त्याला आठवतात ... कुणाचं तरी गोड हसू .. तो चेहरा त्याला अस्वथ करतो .. कधी अपराधाची भावना जागवते तर कधी ओठांवर एक स्मित येते त्याने घालवलेले ते क्षण पुनः जिवंत होतात ... अगदी तसेच ... कधी मित्रांसोबतचे ते क्षण ... एकमेकांना हळूच टोमणा मारून डोळा मारून चिडवणं .. मग तो कट्ट्यावरचा चहा हळूहळू भुरक्या मारत पिणे.. सगळं मग हातातून माती निघून जावी तस निसटून जात .... उरतात फक्त आठवणी अगतिक करून जाणाऱ्या आठवणी .
उगाच मन अगतिक होऊंन जात मनावर .. त्याच्या /तिच्या सोबत ते घालवलेले ते क्षण अस्वस्थ करून जातात
असे एक ना अनेक मनातले धागे उलगडतात आणि मग हळूहळू रात्रीच साम्राज्य पसरत जात आणि मग भानावर येत हळूच ओठांवर हसू येत पुनः नवीन दिवसाची वाट पाहत मनातल्या त्या आठवणी पुन्हा हृदयाच्या कुपीत बंद करून देतो .. अशी हि कातरवेळ सगळ्यांच्या गुपितांची साक्षीदार आणि सगळं सामावून घेणारी कुणालाही काही न सांगणारी ... आपापली गुपित अगदी जपून ठेवणारी कातरवेळ ...
ख़ुशी
१६/०९/२०१६
Comments
Post a Comment