हजारो ख्वाहिशे ऐसी .... कि हर ख्वाहिश पर दम निकले। .... बहोत निकाल मेरे अरमान मगर कम निकले ...
ख्वाइंशे म्हणजे काय तर नेमकं मनातल्या इच्छा .... मनात हजारो इच्छा जनम घेतात ..
मनाला कधी वाटत असं करावा कधी वाटत दूर जावं कधी हे तर कधी ते .. रोज एक ना अनेक इच्छा असतात या वेड्या मनाच्या अगणित इच्छा जन्माला येतात आणि मरतात पण ... कुणी त्याला स्वप्नांचं नाव देत तर कुणी इच्छाच ... कुणासाठी या मनातलेच इच्छा सगळं जग असत तर कुणासाठी या मनातल्या इच्छाच जगण्याचं बळ असतात ... कुणी या इच्छा पूर्ण होण्यासाठी जीवाचं रान करत असत तर कुणी त्यांच्या मागे पळून पळून ठाकतो अन हातातली हत्यार टाकून बसतो... पण म्हणून त्याला काही इच्छा होत नाही असं नाही... आपल्या पुराणांत या इच्छांना मोह असं नाव दिला आहे ... मोह किती गहन आहे हे ...कि माणूस नावाचा प्राणी या इच्छांच्या मागे इतका स्वतःला विसरतो कि जीवन जगायचं सोडून देतो ... त्याच्या मागे पळता पळता सगळं कस आणि कधी मागे सुटून जात त्याला कळतहि नाही ... मनाची एक इच्छा पूर्ण झाली कि लगेच त्याला दुसरी इच्छा होते आणि तो पुन्हा ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून टाकतो ... आणि अशातच त्याच्या जीवनाची संध्याकाळ कधी होते ते हि त्याला कळत नाही.. मग तरीही त्याची एक शेवटची इच्छा असतेच कि ... किती विडंबन आहे नाही कि ज्या इच्छाना पूर्ण करत करत तो या वेळेपर्यंत आलेला असतो तरी त्याला शेवटच्या क्षणी पुन्हा एक इच्छा पूर्ण करायची असते ......!!
Comments
Post a Comment