Skip to main content

Featured

Dear December ❣️

 डियर दिसंबर, तुमसे इश्क़ क्यों है, ये बताना आसान नहीं ..तुम्हारे आते ही नए साल की गिनती शुरू हो जाती है,पर मेरे लिए तुम सिर्फ एक महीना या तारीख नहीं, एक दरवाजा हो—नए सफर, नई कहानियों और नए रास्तों का जो मेरी मंजिलों के और भी मुझे करीब लेकर जाता है ... तुम्हारी ठंडी हवाएं जब चेहरे को छूती हैं, लगता है जैसे पुराने गमों को उड़ाकर ले जा रही हो.. हर बार उसी मलबे में एक नई राह दिखाई है.. शायद इसलिए मैं तुम्हें हर बार एक उम्मीद की तरह देखती हूं.. तुम्हारे आते ही पेड़ों से गिरते पत्ते मुझे सिखाते हैं, कि कुछ छोड़ देना भी जरूरी होता है आगे बढ़ने के लिए.. तुम्हारी शफ्फाक शामों में, जब सूरज धीमे-धीमे डूबता है, मैं खुद को तुम्हारी गोद में एक बच्ची की तरह पाती हूं.. सहमी हुई, पर भरोसे से भरी...तुम्हारे साथ मैं अपना सारा बोझ हल्का कर देती हूं...तुम्हारी दस्तक हमेशा रहती है, एक दुआ की तरह, एक बदलाव की तरह.. तुम्हारी रूह की सर्दियों में जीते हुए, गुजरे हुए साल के लम्हों को फिर से जीती हूं ... ताकी इस गुजरे हुए साल की यादें छोड़कर आगे नए साल में बढ़ पाऊं .. नई उम्मीदों के साथ .. कुछ साथी जो साथ चल...

Prem....

"तू सकाळी आंघोळ झाली की आधी काय करतोस...?"
अचानक तिने मला प्रश्न केला...
मी उत्तर दिलं, "सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावतो"....
त्यावर तिने विचारलं, "का...?
"आपल्या घरात तर वीज आहे शिवाय दिवस ही आहे तरी देवाला वेगळा दिवा लावायची गरज का भासते...?"..
माझ्याकडे ह्या प्रश्नाचं तसं बघायला गेले तर उत्तरच नव्हतं...

तरी मी म्हणालो की देवापुढे उभं राहीलं, निरांंजन लावलं की मला मनःशांती मिळते"...

त्यावर पुढे जे काही ती बोलली ते तुम्हा सर्वांबरोबर आवर्जून शेअर करावस वाटतं....

ती म्हणाली "कदाचित आत्ता मी जे सांगत आहे ते तुला काहीसं विसंगत वाटेल, पण समजून घे"
तुला सांगू का, प्रत्येक माणसाची जातकुळी वेगळी असते.
आपण एखाद्याला बघितल्यावर किंवा त्याच्या वागण्यावरून काही विशेष ठोकताळे बांधतो.
काही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही
मन एक अजीब रसायन आहे

फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते, कितीही सुन्दर दिसत असली तरीही...कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो..शरीर तर निमित्तमात्र आहे...त्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा , विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते
.
..तू म्हणतोस देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं...घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो...सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं...एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळत

आयुष्यात ही अनेक लोक येतात आणि जातात..काही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात.परंतु ह्या सगळ्यात खरं प्रेम समईच्या ज्योतीसारखं रहातं.शांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारं. जगण्याची उमेद देत.

असे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं मला वाटतं...पण आजकाल असं प्रेम मिळणं ही गोष्ट अशक्य आहे, त्यावर मी प्रसन्न हसलो...!
कारण प्रेमाची एक वेगळी व्याख्या वेगळ्या शब्दात आज मी अनुभवत होतो...


Comments

  1. प्रेम या विषयावर तुम्ही जेवढं लीहता तेवढं कमीच आहे.

    प्रेम या विषयावर मी जेवढं तुमचं ब्लॉग वाचतो तेवढं कमी आहे.

    प्रेम... 💕 अनंत आहे ना म्हणून....

    तुमचं आणि माझं प्रेम सारखच आहे.
    अनंत.... प्रेम 💕

    प्रत्येक क्षण मी तिची (राधिका) वाट पाहत आहे.. कुठे आहे? कशी आहे? माहित नाही... तिचा contact number पन नाही.

    अकेले रहकर उनसे दिल से बात करता हूं। आपका ब्लॉग पढ़ते समय भी आंख में से अश्रु निकाल आते है।

    प्रेम 💕 जीवन आहे....

    श्री कृष्ण कहते है जो डगर आसान हो वो डगर प्रेम की हो ही नहीं सकती ।
    राधे 💕 राधे 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts