Skip to main content

Featured

Writing

 मैंने अब धीरे-धीरे सीख लिया है या यूं कहूँ की कोई सिखा कर गया ..कि ज़िंदगी हर किसी को अपनी मुट्ठी में क़ैद कर लेने का नाम नहीं,बल्कि वक़्त आने पर मुस्कुराकर रुख़्सत कर देने का हुनर है..पहले मैं बहुत रोकती थी लोगों को भी,रिश्तों को भी,यहाँ तक कि उन लम्हों को भी जो मेरी उँगलियों से फिसल चुके थे..फिर एक दिन समझ आया,मोहब्बत का मतलब किसी को थामे रखना नहीं, बल्कि उसके हिस्से की आज़ादी को भी उतनी ही शिद्दत से चाहना है अब जो चला जाता है, उसे बद्दुआ नहीं देती, सिर्फ़ अपनी दुआओँ से आहिस्ता-आहिस्ता विदा कर देती हूँ हाँ, दर्द अब भी होता है, आँखें आज भी भर आती हैं,मगर मैंने अपने आँसुओं से भी कह दिया है हर बिछड़ना मातम नहीं होता..मैंने सीखा है...कुछ लोग हमारी ज़िंदगी में हमेशा रहने नहीं, हमें बदलने आते हैं... और जब उनका काम पूरा हो जाता है, तो उन्हें रोक लेना अपने ही हिस्से की रौशनी से इंकार करना होता है..अब मैं जाने देने से नहीं डरती...क्योंकि मुझे यक़ीन है जो मेरी नसीब में लिखा है,वो मुझसे कभी जुदा नहीं होगा बाक़ी सब... वक़्त की अमानत है, और अमानतें एक दिन लौटा दी जाती हैं.. हमे भी वक्त को सब...

Draupadi

महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले ! याचा द्रौपदीला खूप त्रास झाला ! शरीराने व मनाने ती खूप खंगली होती ! वयस्कर दिसत होती ! हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या !
अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती ! एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती.
तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले ! त्याला पाहून तिला रहावलं नाही ! धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली !
ती म्हणते,सख्या असा तर मी विचारच नव्हता केला ! असं कसं झालं ? कृष्ण म्हणाले ,पांचाली नियती खूप निष्ठुर असते ! ती आपल्या मनाप्रमाणे चालते !  द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना ? तू यशस्वी झालीस ! फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले.
द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता !
द्रौपदी म्हणते, कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?
योगेश्वर म्हणतात " नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे ! " आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही.द्रौपदी विचारते, कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का ?
कृष्ण म्हणतात,नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता
द्रौपदी विचारते कृष्णा,मी काय करू शकत होते कृष्ण म्हणतो, तुझ्या स्वयंवराच्या  वेळी तू त्याचा अपमान करायला नको होतास !त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते.
आणि त्यानंतर तू तुझ्या महालात त्याचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं !
कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती.
आपले शब्दच आपल कर्म बनवतात ! आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा ! नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात !

Comments

  1. मी पाहिलेल्या ,वाचलेल्या महाभारत मधील असे अनेक पात्रं आहेत कदाचित त्यामुळे ही महाभारत घडलं असेल.
    धृतराष्ट्र, महामहीम भीष्म,गुरु द्रोणाचार्य , कर्ण.

    ReplyDelete
  2. Ho Mahabharatatlya pratek patrache ek auchitya hot

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts