Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Geet Ramayan...

आता जेव्हा रामायण पुन्हा प्रसारित होतंय तर एक अजून रामायणाची आठवण झाली

कविश्रेष्ठ "ग. दि. माडगूळकर" यांचे ‘गीतरामायण’ हे कथाकाव्य पुस्तकरूपात प्रसिद्ध होऊन साठ पेक्षा अधिक वर्षे झाली.
1955 च्या 1 एप्रिलला रामनवमीदिवशी आकाशवाणीच पुणे स्थानकावरून-‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती।।’ हे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या 56 पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला.

दर आठवडय़ाला एक अशी सुमारे वर्षभर ही छप्पन्न गीते प्रसारित झाली व त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
श्रोत्यांच्या आग्रहावरून ती पुन्हा एकदा प्रसारित करावी लागली. त्यानंतर गावोगावी या गीतांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. खेडोपाडी ही गीते पोचली, लोकांच्या ओठी बसली.

सुशिक्षित मराठी माणसाची एक पिढी ही गीते ऐकता ऐकता मोठी झाली.मुळात रामकथेची लोकमानसावर जबरदस्त मोहिनी आहे.सहस्रके उलटली तरी ती तशीच टिकून आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी रामकथा दूरदर्शनच्या पडद्यावर साकार झाली तेव्हा सादरीकरणाचे, अभिनयाचे, पटकथेचे, संवादांचे असे सगळे दोष पोटात घालून लोकांनी तिला उदार आश्रय दिला लोक भक्तिभावाने, शुचिर्भूत होऊन दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसू लागले. धूपदीप लावून पडद्याची पूजा करू लागले. रामकथा चालू असताना चित्रपटगृहे ओस पडू लागली.
बरोबर हेच वातावरण साठ वर्षांपूर्वी गीतरामायणामुळे महाराष्ट्रात निर्माण झाले होते.

मराठी लोकमानसाला रामकथा पुन्हा हवी होती, नव्या रूपात हवी होती. ती गरज गेय रूपातल्या गीतरामायणाने पूर्ण केली.
गीतरामायणाच्या यशात कवीचा वाटा किती आणि संगीत-दिग्दर्शक सुधीर फडके आणि सर्व गायक-गायिका यांचा वाटा किती यावर खूप वादविवाद झाले.
त्या काळी आकाशवाणीमुळे ही गीते घरोघरी पोचली आणि त्यांच्या सुश्राव्यतेमुळेच लोकप्रिय झाली, हे निर्विवाद. ही गाणी एकदा ओठी रुळल्यावर हळूहळू सुरांमागच्या शब्दांची ताकद लोकांच्या लक्षात येऊ लागली आणि त्यातला आशय मनांत ठसला.
आज साठ वर्षांनंतर सूर काहीसे विरून गेले आहेत आणि शब्द मात्र मागे उरले आहेत, असेच जाणवते.पुस्तकाच्या प्रस्तावनेत कविवर्य बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे सुंदर कल्पना आणि अमर सुभाषिते ही या गीतरामायणात ठायी ठायी विखुरली आहेत.यातली काही गीते ही रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील, ही बोरकरांची भविष्यवाणी ही खरी ठरताना आपण पाहतो आहोत.

~ from some articles remembering "Geet Ramayan

Comments

Popular Posts